कचरा न उचलण्याची कंत्राटदारांची धमकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

पालिकेने बजावली होती कारणे दाखवा नोटीस


मुंबई : पालिकेने कच-यात डेब्रीज भेसळीवरून कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मागे घ्या, अन्यथा २७ जानेवारीपासून कचरा उचलणार नाही, असा इशारा कंत्राटदारांनी पालिकेला दिला आहे. मुंबईतील कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडपर्यंत वाहून नेण्याचे कामवाहतूक कंत्राटदार -९ ग्रुपच्या माध्यमातून करतात. चार महिन्यांपूर्वी प्रशासनाने अचानक केलेल्या तपासणीमध्ये हे कंत्राटदार वजन वाढविण्यासाठी कच-यात भेसळ करत असल्याचे उघड झाले होते. पालिकेने फसवणूक केल्याप्रकरणी या कंत्राटदारांविरोधात पोलीस तक्रार करत त्यांना ’कारणे दाखवा’ नोटीस बजावली गेली आहे. ही नोटीसच आता १८०० कोटींचे कचरा वाहतुकीचे नवीन टेंडर मिळविण्यात अडचण ठरू लागले आहे. त्यामुळेच कंत्राटदारांनी हा पवित्रा घेतला आहे.


मुंबईत दररोज सुमारे साडेसात हजार मेट्रिक टन कचरा गोळा होतो. हा कचरा डम्पिंग ग्राऊंडपर्यंत गाड्यांनी पोहोचविण्याचे कामकंत्राटदारांचे १४ गट करतात. पुढील सात वर्षांसाठी कचरा उचलण्यासाठी पालिकेने १८०० कोटी रुपयांची कामे निश्चित केली आहेत. यासाठी १४ गटांपैकी चार गटांबाबत कोणतेही आक्षेप नसून दहा गटांवर भेसळखोरीचे आरोप झाले आहेत. हे दहा कंत्राटदार गट कमी दराने कामकरण्यास तयार असून त्यांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. मात्र डेब्रिज भेसळ करण्यात अडकल्याने त्यांची कंत्राटे धोक्यात आली आहेत तर नालेसफाई घोटाळ्यात काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपनीचाही या भेसळखोरांमध्ये समावेश असून एकूण चार ग्रुपमध्ये ही कंपनी असल्याचे सांगितले जाते.
@@AUTHORINFO_V1@@