शंकर महादेवन यांची येरवडा कारागृहात रंगली मैफल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

 
पुणे :  संपूर्ण एशियात सगळ्यात मोठ्या समजल्या जाणाऱ्या येरवडा येथील कारागृहात काल कैद्यांना शंकर महादेवन यांच्या सुरेल गीतांना अनुभवण्याची संधी मिळाली. काल पुण्यातील येरवडा येथील कारागृहात शंकर महादेवन यांची मैफल रंगली. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डीआयजी स्वाती साठे यांनी ट्विटरच्या माध्यमातून या कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे. 
 
 
 
 
"कैद्यांसाठी हा एक रोमांचकारी अनुभव होता. आम्ही जेलमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत परंतु हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आहे." अशा भावना कारागृहाचे एडीजी भूषण कुमार उपाध्याय यांनी व्यक्त केल्या. "कैद्यांना एक वेगळा अनुभव घेता आला यासाठी मी शंकर महादेवन यांचा आभारी आहे." असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
"माझ्या आयु्ष्यातील हा एक विलक्षण अनुभव होता. माझ्या आयुष्यात हे अनुभव कधीच विसरू शकणार नाही या आश्चर्यकारक अनुभवासाठी सर्व लोकांना धन्यवाद हे अतिशय प्रेरणादायक होते. माझ्या आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांपैकी हा प्रेक्षकवर्ग सगळ्यात वेगळा होता." अशा शंकर महादेवन यांनी व्यक्त केल्या. कैद्यांच्या आयुष्यातील देखील हा एक विलक्षण अनुभव असल्याचे कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@