आजपासून रंगणार अभाविपचा 'प्रतिभा संगम'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

 
 
 
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दर वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिभा संगम या १६व्या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आज दुपारी ३ वाजता ग्रंथदिंडीने या संमेलनास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता प्रदर्शनीचे उद्घाटन होणार असून  ६ वाजता उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता होणार आहे.
 
  
सलग तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध मान्यवरांच्या मुलाखती, परिसंवाद, कविसंमेलन, भाषणसत्र, कथाकथन यांसारखे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संपूर्ण राज्यभरातून कथा, कविता, वैचारिक लेख, पथनाट्य असे साहित्य प्रकार विद्यार्थ्यांकडून मागवण्यात आले आहेत. या संमेलनात प्राध्यापकांचे एकत्रिकरण व चर्चा यांचेही आयोजन करण्यात आले आहे. २१ जानेवारीला संध्याकाळी ४ वाजता समारोप सत्राने या संमेलनाची सांगता होणार आहे.
 
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दर वर्षी अभाविपतर्फे असे साहित्य संमेलन भरवण्यात येते. आतापर्यंत गेल्या १५ वर्षांत अंमळनेर, रत्नागिरी, सांगली, जळगांव, सोलापूर मुंबई, गोवा, परभणी यांसह विविध ठिकाणी हे संमेलन भरवण्यात आलेले आहे. संमेलनाचे हे १६ वेे वर्ष आहे.
@@AUTHORINFO_V1@@