'एक ध्वज, एक संघ'; उ. आणि द. कोरियाचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

ऑलम्पिक स्पर्धेत होणार एकत्र सहभागी


सोल : गेल्या दीड वर्षापासून कोरियन द्वीपकल्पात निर्माण झालेले तणाव आता नष्ट चिन्हे दिसत आहे. कारण दक्षिण कोरियामध्ये यंदा होणाऱ्या हिवाळी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश एकाचा ध्वजाखाली स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून या स्पर्धेत दोन्ही देशांचा मिळून एकच संघ सहभागी होणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांसाठी अत्यंत ऐतिहासिक असा क्षण असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंध पूर्वपदावर येण्यासाठी याचा खूप फायदा होणार आहे.
उत्तर कोरियाबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ९ फेब्रुवारीपासून द.कोरियामध्ये ऑलम्पिक स्पर्धांना सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दोन्ही देश एकाच ध्वजाखाली मार्च करणार आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियाकडून देण्यात आली आहे. तसेच देशांचा संघ देखील एकच असणार असून यामध्ये दोन्ही देशातील खेळाडूंना सहभागी करून घेणार असल्याचेही कोरियाकडून सांगण्यात आले आहे. तसेच हा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण असेल, असे देखील दक्षिण कोरियाने म्हटले आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये उत्तर कोरियाने सातत्याने केलेल्या अणुचाचण्या आणि क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कमालीचा तेढ निर्माण झाला होता. यावर चर्चा करण्यासाठी दक्षिण कोरियाने उ.कोरियाला वारंवारपणे आवाहन केले होते. परंतु उ.कोरियाकडून कसलीही प्रतिक्रिया आली नव्हती. सरतेशेवटी नवीन वर्षाच्या सुरुवातील उत्तर कोरियाकडून ऑलम्पिक स्पर्धेत आपले खेळाडू देखील सहभागी होणार असल्याची घोषणा करण्यात आली व यानंतर दोन्ही देशांमध्ये या विषयी चर्चा झाली होती.
@@AUTHORINFO_V1@@