ईशान्य भारतात निवडणुकीच्या तारखा जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

 
नवी दिल्ली : भारताच्या ईशान्य भागामध्ये वसलेल्या मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज अखेर घोषणा करण्यात आली. त्रिपुरा येथे १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मेघालय आणि नागालँड येथे २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच तीनही राज्यांची मतमोजणी ३ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे आज दुपारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
 
 
 
 
तसेच त्रिपुरा येथे अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी आहे, तर मेघालय आणि नागालँड येथे अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी आहे, असेही या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले आहे.  
 
निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ए.के.ज्योती यांनी या निवणडुकींची रूपरेषा आणि तारखा जाहीर केल्या. तसेच आजपासून या तीनही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचेही जाहीर केले. मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीनही राज्यांमध्ये प्रत्येकी ६० जागा असणार आहे, आणि या ६० जागांसाठी निवडणूक होणार आहे.
 
तीनही राज्यांमध्ये ईव्हीएम आणि व्ही.व्ही.पी.ए.टी. मशीन असणार आहेत. याबद्दल प्राथमिक चाचणी करण्यात आली आहे, असेही ज्योती यांनी जाहीर केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@