ईशान्य भारतातील निवडणुकांचे आज वाजणार बिगुल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |


नवी दिल्ली : भारताच्या ईशान्य भागामध्ये वसलेल्या मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषण आज करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी या संबंधी एक पत्रकार परिषद घेऊन या तिन्ही राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणार आहे.

आज दुपारी १२ वाजता यासंबंधी पत्रकार परिषद देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ए.के.ज्योती हे स्वतः या तिन्ही राज्यांच्या निवडणुक कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आणि वेळेची घोषणा करणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. दरम्यान कर्नाटक निवडणुकांची तारीख देखील लवकरच जाहीर करण्यात येणार असून अद्याप कर्नाटक निवडणुकांसंबंधी काही चर्चा आणि निर्णय घेणे बाकी आहे, असेही आयोगाने म्हटले आहे.

उत्तर तसेच मध्य भारत आपल्या टाचे खाली आणल्यानंतर देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनलेल्या भाजपचे सर्व पूर्ण लक्ष आता दक्षिण आणि ईशान्य भारताकडे लागलेले आहे. ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल आणि मणिपूरमध्ये या अगोदर भाजपने आपले झेंडा रोवलेला आहे. त्यामुळे आता या तीन राज्यांमध्ये देखील सत्ता पलट करण्यासाठी भाजप सहज होत आहे. विशेष करून त्रिपुरामध्ये असलेल्या कम्युनिस्ट सरकारला पूर्णपणे शह देवून त्याठिकाणी सत्ता स्थापण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तसेच राहुल गांधी हे कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर आपल्या पक्षाला आणखीन नवीन उभारी देण्यासाठी कॉंग्रेस देखील या निवडणुकांमध्ये कंबर कसून उतरण्याच्या तयारीला लागली आहे.
@@AUTHORINFO_V1@@