'पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणणे गरजेचे' : अमेरिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |



न्यूयॉर्क : 'पाकिस्तानची वर्तणूक बदलण्यासाठी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणणे गरजेचे आहे' असे मत अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत निकी हेले यांनी व्यक्त केले आहे. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

हेले यांनी नुकताच केलेल्या अफगणिस्तानच्या दौऱ्याविषयी प्रथम उपस्थिताना माहिती दिली. अफगाणिस्तानमध्ये अमेरिका सध्या करत असलेल्या अनेक कार्यांची माहिती देत अफगाणिस्तानकडून यासाठी मिळत असलेल्या सहयोगबद्दल देखील त्यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानकडून अजून देखील दहशतवादी कारवायांवर अंकुश घालण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  'अफगाणिस्तानमध्ये शांतात प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानची वागणूक बदलणे अत्यंत गरजेची आहे. यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकणे देखील गरजेचे आहे जेणेकरून पाकिस्तान आपली मूळ प्रवृत्ती सोडून आपल्या वर्तणुकीत बदल करेल, यासाठी सुरक्षा परिषदेतील सर्व देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकावा' असे आवाहन देखील त्यांनी वेळी केले.

अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. अमेरिकेच्या सैनिकांनी देखील आपल्या प्राणांच्या आहुत्या दिलेल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेच्या प्रयत्नांना आता यश येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय समुदायांनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.
 
@@AUTHORINFO_V1@@