अरुण जेटली यांची अर्थसंकल्प पूर्व बैठक संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

 
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची सर्व राज्यांच्या अर्थमंत्रीसोबत अर्थसंकल्प पूर्व बैठक संपन्न झाली. दिल्ली येथील विज्ञान भवनात ही बैठक झाली असून, यात राज्यांतील कॅबिनेट मंत्र्यांसोबतच राज्यमंत्री देखील सामील होते. याबैठकीत हिमाचलप्रदेश, पॅण्डिच्चेरी या राज्यांचे मुख्यमंत्री तसेच, गुजरात, बिहार, मणिपूर, तामिळनाडू सहित इतर १४ राज्यांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झाले होते.
 
 
विविध राज्यांच्या या प्रतिनिधींनी २०१८-१९ या आर्थिक वर्षातील अपेक्षा, दृष्टीकोन, आणि सूचना यात मांडल्या गेल्या आहेत. प्रत्येक राज्याच्या आवश्यकतेनुसार याबद्दलचे पुढचे धोरण केंद्राद्वारे ठरविण्यात येईल.
 
 
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, राज्यांकडून ज्या पद्धतीने अपेक्षा आणि सूचनांची मांडणी झाली आहे, त्यानुसार २०१८-१९ या आर्थिकवर्षातील अर्थसंकल्प जनतेच्या अपेक्षेप्रमाणे असेल. यातून सामान्यनागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाला मोठ्याप्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@