स्वदेशी बनावटीचे अग्नी - ५ चे यशस्वी प्रक्षेपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |
 
 
ओडिसा : जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी - ५ या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज करण्यात आली. ओडिसाच्या किनारपट्टीवर असलेल्या प्रक्षपेण केंद्रावरून ही चाचणी करण्यात आली.
 
 
या अग्नी- ५च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी डी.आर.डी.ओ चे अभिनंदन केले आहे.
 
 
 
अग्नी - ५ क्षेपणास्त्र हे स्वदेशी बनावटीचे अण्विक क्षमता असलेले क्षेपणास्त्र आहे. अग्नी क्षेपणास्त्रांच्या तुकडीतील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलेले हे क्षेपणास्त्र ५००० किलोमीटरच्या कक्षेत मारा करू शकेल, अशी माहिती देण्यात आली आहे. 
@@AUTHORINFO_V1@@