अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर जीएसटी परिषदेची आज बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |





नवी दिल्ली :
२०१८-१९ या वर्षीच्या अर्थ संकल्पाच्या पार्श्वभूमीवर जीएसटी परिषदेचे महत्त्वपूर्ण बैठक आज नवी दिल्ली येथे होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून जीएसटी परिषदेबरोबरच नीती आयोग आणि सरकारमधील काही महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नव्या वर्षी करस्वरूपातील बदल आणि इतर विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

गेल्या सहा महिन्यामध्ये जीएसटीमुळे देशातील कर व्यवस्था आणि बाजारपेठेवर पडलेला प्रभाव या मुख्य विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या दृष्टीने आवश्यक असलेले महत्त्वाचे बदल करण्यावर देखील यात चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच रिअल इस्टेट क्षेत्राचा जीएसटीमध्ये समावेश करणे आणि या क्षेत्रासंबंधी काही महत्त्वाच्या विषयांवर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाकडून देशातील वित्तीय व्यवस्थेशी संलग्न असलेल्या सर्व शासकीय तसेच निमशासकीय आढावा बैठका घेतल्या जात आहे. याच बरोबर सरकारच्या दृष्टीने देखील यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सरकार अनेक नवनवीन गोष्टींचा समावेश करण्याची शक्यता आहे.
@@AUTHORINFO_V1@@