नियंत्रण रेषेवर तीन ठिकाणी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

एक जवान शहीद, चार नागरिक जखमी




जम्मू-काश्मीर : जम्मूमधील सांबा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील तीन सेक्टरवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून पाकिस्तानच्या गोळीबारमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला असून सीमेजवळील गावांमधील चार नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या सर्व जखमी नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून देखील चोख प्रतिउत्तर दिले जात आहे.

सांबा जिल्ह्यातील आरएस पुरा, अर्णिया, रामगड या तीन ठिकाणी काल रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय चौक्यांना लक्ष करत गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबारबरोबर भारतीय चौक्यांवर मॉर्टर शेलिंग देखील करण्यात आली. यामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलातील एक जवान शहीद झाला असून ए.सुरेश असे या जवानाचे नाव आहे. याच बरोबर रात्री अंधारात झालेल्या या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेजवळ असलेले चार नागरिक देखील जखमी झाले.

गेल्या तीन दिवसांपूर्वी उरी सेक्टरजवळ भारतीय सीमेत घुसखोरी करत असलेल्या पाच दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्नान घातले होते. तसेच पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला उत्तर देत पाकिस्तानचे देखील पाच सैनिक मारले होते. यावर पाकिस्तानने तीव्र निषेध नोंदवत भारतावर टीका केली होती व भारत पाकिस्तानवर सातत्याने हल्ले करत असल्याचा आरोप केला होता. भारताच्या या चोख प्रतिउत्तरवरच चिडून पाकिस्तानने हा हल्ला केल्याची शक्यता लष्कराकडून वर्तवली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@