नंदुरबार जिल्ह्याला २०१८-१९ साठी ५३१ कोटीचा बजेट मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

 
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याचा २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) चा आराखडा ६४.०८ कोटी रुपयांचा असून या नियतव्यास मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ११.४० कोटी रुपये, आदिवासी उपयोजना (टीएसपी) करीता ४५०.२४ कोटी रुपयांचा, तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) करीता ६ कोटी २५ लक्ष रुपयांचा बजेट मंजूर करण्यात आला आहे.
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज सकाळी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक, खासदार डॉ. हीना गावित, आमदार सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, सुरुपसिंग नाईक, डॉ. विजयकुमार गावित, ॲङ के. सी. पाडवी, उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
 
पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात नावीण्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करावी. आरोग्य, महिला, पाणीपुरवठा, शिक्षण, मुलांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. जलयुक्त शिवार अभियानासह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना तालुका, ग्राम पातळीवर लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. यंत्रणांनी निधी उपलब्ध होताच कामांना सुरवात करावी.
 
कृषी विभागासह विविध योजनांची प्रचार व प्रसिध्दी करीत योजना गावपातळीवरील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी मार्च 2018 अखेर खर्च करावा. निधी खर्च करण्यासाठी नियोजन करावे. प्रशासकीय मान्यता घेत कामांचे कार्यादेश तत्काळ द्यावेत, असेही निर्देश पालकमंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@