बुडणाऱ्या पाकिस्तानला रशियाचा हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |



मॉस्को : दहशतवादाच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर अमरिकेने लाथाडल्यानंतर एकाकी पडलेल्या पाकिस्तानला सावरण्यासाठी अमेरिकेचा पारंपारिक शत्रू समजला जाणारा रशिया आता पुढे सरसावला आहे. 'पाकिस्तान हा दहशतवादाबरोबर प्रामाणिकपणे लढला असून पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी तसेच पाकिस्तानचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत यापुढे रशिया पुरवेल' असे आश्वासन रशिया परराष्ट्र मंत्री सेर्गेई लाव्हरोव्ह यांनी आज दिले आहे. तसेच लवकरच पाकिस्तान बरोबर नवे करार देखील केले जातील, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. रशियाची राजधानी मॉस्को येथे पार पडलेल्या एका बैठकीमध्ये ते बोलत होते.

अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या दहशतवादाचा अफगाणिस्तान बरोबरच पाकिस्तानला देखील मोठा त्रास होत आहे. यामुळे पाकिस्तानची आजपर्यंत अपरिमित हानी झालेली आहे. परंतु यापुढे पाकिस्तानला आवश्यक ती सर्व मदत रशियाकडून केली जाईल, असे लाव्हरोव्ह यांनी स्पष्ट केले. याच बरोबर शांघाई कॉर्पोरेशन पाकिस्तानला सहभागी करून घेण्यासाठी रशिया पाकिस्तान पाठींबा देईल. पाकिस्तानबरोबर नवे करार आणि शस्त्रास्त्रांचे नवे व्यवहार देखील करण्यास रशिया तयार आहे, अशा अनेक घोषणा आणि आश्वासने त्यांनी यावेळी दिली. दरम्यान रशियाच्या या वक्तव्यावर पाकिस्तान मात्र अद्याप कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.



गेल्या वर्षभरात अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरुन सातत्याने लाथाडले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तर पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी नंदनवन असल्याचे देखील घोषित केले होते. तसेच अमेरिकेकडून देण्यात येणारी आर्थिक मदत देखील यापुढे बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडला होता. अशा वेळी रशिया पाकिस्तानला जवळ करणार हे भाकीत काही जाणकार व्यक्तींनी केले होते. त्याप्रमाणे रशियाने आज ही घोषणा करून अमेरिकेला एकप्रकारे शह देण्याचा प्रयत्न आता सुरु केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@