चेतेश्वर, रोहित किंवा हार्दिक भारताला पराभवापासून वाचवू शकतील का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

अखेरच्या दिवशी विजयासाठी २५२ धावांची गरज
 

 
 
सेंच्युरियन : दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात एबी डिव्हिलियर्स (८०) व डी. एल्गर (६१) या जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या सहाय्याने दक्षिण आफ्रिकेने भारता समोर २८७ धावांचे खडतर लक्ष ठेवले आहे. या लक्षाचा सामना करताना भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. धावफलकावर २० धावांची नोंद नसतानाही भारताचे सलामीवीर मुरली विजय (९) व लोकेश राहुल (४) बाद झाले. राबडाने विजयचा सुरेख त्रिफळा उडवला.
 
 

त्याच्यानंतर नंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीलाही अगदी स्वस्तात पायचीत करण्यात दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज याला यश आले. त्यानेच राहुलचाही बळी घेतला होता. कालच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या ३५ धावा केल्या होत्या. त्यामुळे आज पाचव्या दिवशी भारतीय संघाची पूर्ण मदार चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा व हार्दिक पांड्या या अनुभवी खेळाडूंवर असणार आहे. एकूणच दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यासमोर भारतीय खेळाडूंचा टिकाव लागणे अवघड आहे, पण त्यातही या वरील खेळाडूंनी काही कमाल कामगिरी केली तरच भारताला हा सामना जिंकता येईल किंवा बरोबरीत राखता येईल.
 

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@