पंतप्रधान मोदींसह नेतन्याहू आज करणार गुजरात दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |


गांधीनगर : सहा दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा आज एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी उपस्थित असणार असून या दौऱ्यादरम्यान मोदी आणि नेतन्याहू यांची एक भव्य रॅली देखील निघणार आहे. तसेच इस्राइलचे पंतप्रधान साबरमती आश्रमाला भेट देऊन गुजरातमध्ये आयोजित काही कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होणार आहेत.

आज सकाळी १० वाजता दोन्ही पंतप्रधानांचे अहमदाबाद येथील विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर अहमदाबाद विमानतळापासून ते साबरमती आश्रमपर्यंत दोन्ही पंतप्रधानांची एक मोठी रॅली होणार आहे. तब्बल चौदा किमीची ही रॅली असणार असून या रॅलीसाठी गुजरात सरकार आणि भाजपकडून मोठ्याप्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे.

यानंतर सकाळी ११ वाजता दोन्ही पंतप्रधान गांधी आश्रमामध्ये पोहचतील याठिकाणी काही अनौपचारिक कार्यक्रम पडल्यानंतर गुजरातमधील बावला येथे असलेल्या आयक्रिएट सेंटरमध्ये आयोजित या बैठकीत ते सहभागी होतील. या बैठकीमध्ये देशभरात १५०० उद्योगपती सहभागी होणार आहेत. या बैठकीनंतर गुजरातमध्ये असलेल्या वडराज येथे काही विकास कामांचे तसेच इस्राइलहून आणलेल्या जलशुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान नेतन्याहू हे दोघे यावेळी गुजरातमध्ये उपस्थित असणार आहेत, त्यामुळे गुजरातमधील सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. अहमदाबाद ते साबरमती आश्रमापर्यंतचा संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा दलांबरोबरच इस्राइलचे सुरक्षा व्यवस्था देखील येथे तैनात करण्यात आली आहे. नेतन्याहू आणि मोदींच्या स्वागतासाठी गुजरात प्रशासनाकडून देखील मोठ्या व्यवस्था करण्यात आली असून गुजरात निवडणुकांनंतर मोदींचा हा पहिलाच गुजरात दौरा असणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@