नोव्हेंबर पर्यंत होणार ७० लाख नोकऱ्यांची निर्मिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

अर्थतज्ञांच्या अभ्यासातून पुढे आली आकडेवारी

 
 

 
नोव्हेंबर २०१८ पर्यंत ७० लाख नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचा नुकताच एक अहवाल सादर केला गेला. भारतीय स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष आणि आय आय एम बंगलोरचे प्राध्यापक पुलक घोष यांनी केलेले एका अभ्यासातून ही आकडेवारी पुढे आली आहे.
 
 
मोदी सरकार रोजगार निर्मितीत फोल ठरत असल्याचा विरोधकांच्या आरोपावर या अहवालाने पूर्णपणे पाणी फेरले आहे. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगरीया यांनी देखील या अहवालातील आकडेवारीची पाठराखण केली आहे. अशा प्रकारच्या प्रत्यक्ष आकडेवारीमुळे पुढच्या वाताचालाची दिशा निश्चित होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
'टूवर्डस पेरोल रिपोर्टिंग इंडिया' या अवाने हा अहवाल आय. आय. एम. बंगलोरने प्रसिद्ध केला आहे. १५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात भारतातील मजूर आवश्यकता, सद्यस्थिती आणि पुढची परिस्थिती यावर सखील विश्लेषण दिले गेले आहे.
दरवर्षी देशातून ८८ लाख स्नातक उत्तीर्ण विद्यार्थी बाहेर पडणे अपेक्षित असते, मात्र त्यापैकी २५% गळती होते, जवळपास ६६ लाख विद्यार्थी उत्तीर्ण होऊन रोजगार प्राप्तीसाठी पात्र ठरतात. हि सद्यस्थिती असल्याचे अहवालात सदर केले आहे.
 

 
 
आर्थिक वर्ष २०१७ मध्ये जवळपास ४५ लाख नवीन रोजगारधारक एकूण मुख्य १९० उद्योगांत निर्माण झाले आहेत. २०१८ या आर्थिक वर्षात ही आकडेवारी जवळपास ७० लाखाच्या घरात जाणार असल्याची शक्यता या अहवालात वर्तविली गेली आहे.
डॉ. सौम्य कांती घोष यांनी म्हटले आहे की, रोजगार निर्मितीची गती वाढणार आहे. निर्मिती, कम्प्युटर, टेक्स्टाईल, केमिकल, इंजिनिअरींग, बांधकाम, ट्रेडिंग, कापड उद्योग, इत्यादी यांसारख्या विविध १० उद्योग क्षेत्रात रोजगार निर्मितीची भरीव कामगिरी दिसून येईल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@