उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ९६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |


(कानपूर) उत्तर प्रदेश : कानपूरमधील एका बंद घरामध्ये पाचशे आणि एक हजार रुपयांच्या ९६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आज जप्त करण्यात आल्या.
 
कानपूरमधील बंद घरात जुन्या नोटा असल्याची माहिती मिळताच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए), प्राप्तीकर विभाग आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी धाड टाकून या नोटा जप्त केल्या. नोटामोजणीचे काम अद्याप चालू आहे तसेच यासंदर्भात १६ जणांना अटक केली असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद कुमार यांनी दिली आहे.
 
८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला यानंतर अनेक ठिकाणांवरून जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या मात्र एवढ्या जास्त प्रमाणात जुन्या नोटा जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
@@AUTHORINFO_V1@@