हाफिज साहेबांविरोधात एकही खटला नाही : पाक पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |


इस्लामाबाद :
दहशतवादासंबंधीच्या आपल्या दुटप्पी भुमिकेमुळे जगभरात लाथाडला जात असलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा दहशतवादाला पाठीशी घातले आहे. संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हाफिज सईदविरोधात पाकिस्तानमध्ये एकही खटला अथवा गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहीती पाकिस्तानचे पंतप्रधान शहीद खाक्न अब्बासी यांनी दिली आहे. तसेच ते निर्दोष असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. 
पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अब्बासी हे बोलत होते. 'हाफिज सईद साहब के उपर पाकिस्तान मे कोई भी केस रजिस्टर नाही है' अशी प्रतिक्रिया अब्बासी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. त्यामुळे हाफिज सईद हे निर्दोष असल्याचा निर्वाळाच त्यांनी दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या भूमिकेत बदल केला आहे का ? असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. 
गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सात मुस्लीम देशांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी केली होती. या सात देशांच्या यादीमध्ये पाकिस्तानला देखील टाकण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्यामुळे पाकिस्तानने हाफिज सईदला नजरकैद केले होते. या दरम्यान चालू असलेल्या खटल्यामध्ये पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री चौधरी निसार यांनी हाफिज सईद हा जिहादच्या नावावर दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप न्यायालयासमोर केला होता. परंतु न्यायालयाने याकडे दुर्लक्ष करत हाफिजला गेल्या काही महिन्यांपूर्वी सोडून दिले होते. तसेच संयुक्त राष्ट्रांनी देखील सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेले आहे, त्यामुळे पाक पंतप्रधानाच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ  काय ? असा प्रश्न  सर्वांसमोर उपस्थित झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@