थलायवा नंतर आता चाची ४२० देखील राजकारणाच्या रिंगणात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

 
चेन्नई : दक्षिण भारताच्या राजकारणात आता रणसंग्राम होणार असे दिसून येत आहे. प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणात येणार अशी घोषणा केल्यानंतर आता कमल हासन देखील राजकारणाच्या रिंगणात उतरले आहेत. येत्या २१ फेब्रुवारीला ते आपल्या नवीन पक्षाची घोषणा करणार आहेत. तसेच पक्षाचा पुढील आराखडा जनते समोर मांडणार आहेत.
 
अभिनेता कमल हासन लवकरच राजकारणात पदार्पण करणार असे संकेत गेल्या अनेक दिवसांपासून मिळत होते. ते कुठल्या पक्षात सहभागी होणार याविषयी देखील चर्चा समाज माध्यमांवर रंगली होती. रजनीकांत यांनी ३१ डिसेंबरला आपल्या स्वतंत्र पक्षाची घोषणा केल्यानंतर कमल हासन देखील लवकरच राजकारणात येणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती, अखेर त्यांनी २१ फेब्रुवारीला आपला नवीन पक्ष जाहीर करणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळे हा पक्ष कुठला आहे, तसेच यामध्ये आणखी काय असेल याविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे.
 
अभिनेता कमल हसन २१ फेब्रुवारीपासून तामिळनाडूतील काही भागांना भेटी देणार आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी हा दौरा असल्याचे हसन याने म्हटले आहे. दौऱ्याची सुरुवात रामनाथपुरम येथून होणार असून पहिल्या टप्प्यात मदुराई, डिंडीगुल आणि शिवगंगाई या जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@