गोवंश तस्करी करणाऱ्या 'त्या' तिघांना न्यायालयीन कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |




यवतमाळ : गेल्या दोन दिवसांपूर्वी ट्रकमध्ये निर्दयपणे जनावरे कोंबून त्यांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना यवतमाळ जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पूर्ण तपास झाल्यानंतर या आरोपींना पुढील शिक्षा सुनावली जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे.
गेल्या सोमवारी यवतमाळमधील पांढरकवडा मार्गावर एका ट्रकला अपघात झाल्यामुळे हा ट्रक उलटला होता. ट्रक उलटल्याचे पाहून नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली असता, या ट्रकमध्ये जनावरांची अवैधरीत्या तस्करी होत असल्याचे त्यांचा निदर्शनास आले. यानंतर नागरिकांनी पोलिसांना पाचारण करत घटनेची सर्व माहिती दिली. या ट्रकमध्ये एकूण ३५ जनावरांना अत्यंत निर्दयपणे डांबण्यात आले होती. अपघात ट्रक उलटल्यानंतर यातील १६ जनावरांचा जागीच मृत्यू झाला, तर उरलेल्या १९ जनावरांना अपघातामुळे गंभीर जखमा झाल्या होत्या.

दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना :

यानंतर यवतमाळ पोलिसांनी यावर रीतसर पंचनामा करत, तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. हे तिन्ही आरोपी मध्यप्रदेशमधील असून जनावरांची तस्करी करण्यासाठी म्हणूनच ते यवतमाळमध्ये आले होते. यानंतर पोलिसांनी या आरोपींना न्यायालयासमोर काल उपस्थित केले होते व यावर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
@@AUTHORINFO_V1@@