रोहिंग्या मुस्लिमांच्या पुनर्वसनाचा मार्ग झाला मोकळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

म्यानमार बंगालदेशमध्ये नवा करार
 
दोन वर्षांमध्ये होणार रोहिंग्यांची घरवापसी





ढाका : गेली काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या घुसखोरी आता कायम तोडगा निघाला आहे. रोहिंग्या मुस्लिमांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या नव्या प्रकल्पाला आता मिळाली असून यासंबंधी बांगलादेशबरोबर झालेल्या नव्या कराराला देखील दोन्ही देशांकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच रोहिंग्या मुस्लिमांच्या घरवापसीला सुरुवात होणार आहे.

म्यानमार सरकारने गेल्या दोन महिन्यांपूर्वी बांगलादेश सरकारबरोबर केलेल्या कराराला बांगलादेशचे मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या नव्या करारानुसार बांगलादेशमध्ये असलेल्या सर्व रोहिंग्या मुस्लिमांना त्यांच्या मूळस्थानी अर्थान राखीने प्रांतात सुरक्षितपणे परत पाठवण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही देशांच्या संगत मताने २ वर्ष इतकी मुद्दत ठरवण्यात आली असून या कालावधीमध्ये सर्व रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारमध्ये परत पाठवले जाईल, असे दोन्ही देशांनी कबुल केले आहे. त्यामुळे भारतात देखील अनधिकृतपणे स्थायिक झालेल्या रोहिंग्या मुस्लिमांचा देखील परत आपल्या मायदेशी जाण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे.

बंगलादेश आणि म्यानमारच्या या करारमध्ये भारताने देखील या अगोदर आपली भूमिका मांडली होती. भारतात देखील अनेक ठिकाणी रोहिंग्या मुस्लिमांनी घुसखोरी केली असल्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्या या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होती. त्यामुळे लवकरच भारतातील देखील रोहिंग्या मुस्लीम आपल्या देशात परत जातील, अशी आशा आहे.
@@AUTHORINFO_V1@@