ट्रम्प यांच्या पाक धोरणानंतर प्रथमच अमेरिकी राजदूत भारत भेटीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या वर्षाच्या नव्या पाकिस्तान धोरणानंतर प्रथमच अमेरिकी राजदूत अॅलिस वेल्स या आज भारत भेटीवर येणार आहेत. भारत आणि अमेरिका दरम्यान उच्चस्तरीय चर्चा होणार असून, नव्या पाकिस्तान धोरणांतर्गत अनेक बाबी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.
 
 
याचबरोबर त्या बुधवार दि. १७ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे जागतिक घडामोडींवर होणाऱ्या 'रायसीना डयालॉग' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जागतिक मुद्दे, असणाऱ्या या देशाचे यजमानपद भारताकडे आहे.
 
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी साहाय्य बंद करून, तसेच इतर गुंतवणूक बंद करून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात दणका दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर भारताशी जवळीक वाढण्याची शक्यता जागतिक पातळीवर वर्तवली जात आहे. म्हणूनच वेल्स यांच्या भारत भेटीचे महत्व वाढले आहे.
 
 
भारतात येण्यापूर्वी त्यांनी इस्लामाबादला भेट दिली. तेथे पाकिस्तानी परराष्ट्र अधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा झाली. अमेरिकेच्या बदलत्या राजकीय धोरणानुसार पाकिस्तान-अमेरिकात कोणत्या करारांची शक्यता आहे त्यावर चर्चा झाल्याचे समजते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@