दक्षिण कोरियाचे उ.कोरियाला चर्चेसाठी आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |


सोल : उत्तर कोरियाच्या अणु प्रकल्प तसेच क्षेपणास्त्र चाचणीसंबंधी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली पाहिजे, असे आवाहन दक्षिण कोरियाने केले आहे. तसेच उत्तर कोरियाने चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन देखील दक्षिण कोरियाने केले आहे.

उत्तर कोरियाने गेल्या दोन वर्षांमध्ये सातत्यने केलेल्या अणु चाचण्यांमुळे कोरियन सागरामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर मार्ग काढणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. युद्ध अथवा युद्धाच्या धमक्यांमुळे जागतिक राजकारणात अधिकच वाढू शकतो. त्यामुळे एका शांतता पूर्ण वातावरणात उत्तर कोरियाला ज्या काही समस्या असतील त्यावर चर्चा व्हावी व यासाठी दक्षिण कोरिया सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया दक्षिण कोरियाच्या सरकारने दिली आहे. दरम्यान उत्तर कोरियाकडून मात्र अद्याप तरी कसलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

गेल्या दोन वर्षांपासून उत्तर कोरियाच्या अणु चाचाण्यामुळे उत्तर कोरियाचे द.कोरिया, जपान आणि अमेरिकेबरोबर असलेले संबंध कमालीचे बिघडले होते. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी द.कोरियात होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या खेळाडूंना देखील पाठवण्याची इच्छा उ.कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांनी व्यक्त केली होती. या संबंधी द.कोरियाशी चर्चा करण्याची देखील तयारी दर्शवली होती. यानुसार दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन संबंध सुधारण्याकडे एक पाऊल पुढे पडले आहे. त्यामुळे उत्तर कोरियाने आणखीन काही विषयांवर चर्चेसाठी देखील पुढाकार घ्यावा, असे द.कोरियाने म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@