वसईतील सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

 

 
 
खानिवडे : वसई तालुक्यातील वसईफाटा या पूर्व भागात भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते करण्यात आले. वसई फाटा येथील परमार इंडस्ट्रीज येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी या भागातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
 
पालकमंत्र्यांनी प्रवेशकर्त्यांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना कधीच निराशा होणार नाही, असे आश्‍वासन देऊन भाजप म्हणजे सर्वांना घेऊन चालणारा पक्ष असून येथे कोणतीही जात-पात, पंथ, भेद पाहिले जात नाहीत. सर्वांना सारखाच सन्मान देणारा पक्ष असल्याने पक्षाची व्याप्ती वाढतच आहे, असे सांगितले. तर या भागात जिल्हा सचिव राजू म्हात्रे यांचे संघटन कौशल्य चांगला जोर धरत असल्याचे दिसत असून त्यांच्या नेतृत्वाखाली वसईत पक्ष मोठी झेप घेत असल्याचे सांगितले.
 
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव राजू म्हात्रे, कैलास म्हात्रे, चंद्रकांत घरत, निशीकांत म्हात्रे, सुनील किणी, रमाकांत पंडित, विवेक भोस्कर, राजेंद्र जायस्वाल, राजेश किणी, देवराम म्हात्रे, कैलास डी म्हात्रे, विश्‍वंभर चोपडेकर, नूतन कुवर, कुंदन भगली, राजू बनसोडे, नीलकंठ सुतार, भूषण नाईक, धर्मेंद्र मिश्रा, सी. बी. मिश्रा, योगेश चोबिसा, मनीष गुप्ता, बाळू भोईर इ. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद सावरकर यांनी केले होते. त्यांना वसई मंडळ वाहतूक सेल अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमात राजू म्हात्रे, चंद्रकांत घरत यांचे भाषण झाले. तसेच विष्णू सावरा यांनी कार्यकर्त्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसई पूर्व मंडळ उपाध्यक्ष विवेक भोस्कर यांनी तर गणेश किणी यांनी आभार मानले.
 
@@AUTHORINFO_V1@@