युवकांनी संशोधनाच्या माध्यमातून देशापुढील समस्या सोडवाव्यात : मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

देशाचा आकार नाही तर देशवासियांचा संकल्प देशाला पुढे नेतो : नरेंद्र मोदी


 
 
अहमदाबाद : देशाचा आकार नव्हे तर देशवासियांचा संकल्प देशाला पुढे घेऊन जातो. देशातील युवकांनी स्वप्ने पाहणे थांबवू नये कारण मोठी स्वप्नेच मोठे फळ देऊ शकतात असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातमधील अहमदाबाद येथे आयक्रिएट अर्थात आंतरराष्ट्रीय उद्योजकता व तंत्रज्ञान विकास केंद्राचे उद्घाटन गेले ४ दिवस भारत दौऱ्यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नेतान्याहू यांच्या पत्नी सारा नेतान्याहू, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आयक्रिएट मधून बाहेर पडणारे विद्यार्थी संशोधनाच्या क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करतील अशी मला आशा आहे असे मोदी यावेळी म्हणाले. नेतान्याहू यांनी गुजरातला येण्याचे आमंत्रण स्वीकारले यासाठी मोदी यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
 
 
इस्रायलच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत या केंद्राचे लोकार्पण होत आहे याचा आपल्याला विशेष आनंद होत आहे असे सांगतनाच मोदी पुढे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी आयक्रिएटची कल्पना मी केली होती तेव्हाच ठरवले होते की हे केंद्र इस्रायलशी जोडले जावे. इस्रायलच्या या क्षेत्रातील अनुभवाचा फायदा देशातील युवकांना मिळावा हीच त्यामागची कल्पना होती. या केंद्राच्या माध्यमातून देशातील युवकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता येणार आहेत असे मोदी यावेळी म्हणाले. इस्रायलचे तंत्रज्ञान व सर्जनशीलता यामुळे संपूर्ण विश्व प्रभावित झाले आहे अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी इस्रायलचा गौरव केला.
 
 
 
देशातील युवकांनी संशोधनाच्या माध्यमातून देशासमोरील समस्यांवर उपाय शोधून काढण्याची आज गरज आहे. तसेच सर्वसामान्य व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी कमीतकमी खर्चात काय करता येऊ शकते याचाही विचार केला जावा अशी अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान या कार्यक्रमापूर्वी नेतान्याहू पती-पत्नी यांनी साबरमती येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट दिली व आदरांजली वाहिली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण - 
 
 
 
 
 
जय हिंद, जय भारत, जय इस्रायल - 
 
दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आपल्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन करण्याचा निर्णय मोदी यांनी घेतली ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे नेतान्याहू यावेळी म्हणाले. इस्रायल अशा सर्वच उपक्रमांना नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. तसेच आपल्या भाषणाचा शेवट करताना त्यांनी खास हिंदीतून "जय हिंद, जय भारत, जय इस्रायल" अशी घोषणा देऊन उपस्थितांची मने जिंकली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@