इस्त्राइली तंत्रज्ञान भारतीय शेतीसाठी फायदेशीर - नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |
 
 
इंडो-इस्त्राइल संबंधातील पहिल्या उत्कृष्टता केंद्राचे वडरडमध्ये उद्घाटन

वडरड, गुजराथ : कमीत कमी पाण्याचा नीट वापर करून भरघोस उत्पन्न देणारी शेती करता येते हे संपूर्ण जगाला इस्त्राइलने दाखवून दिले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणले आहे. गुजराथमधील वरवड येथे भारत-इस्त्राइल यांच्या संयुक्त विद्यमानाने निर्माण झालेल्या उतृष्टता केंद्रांचे उद्घाटन आज पंतप्रधान आणि इस्त्राइलचे पंतप्रधान बेन्जामीन नेत्यान्यहू यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. भारतीय शेतकऱ्यांचा असा समज आहे की, शेतात संपूर्ण पाणी भरल्याशिवाय चांगला पीक येत नाही. तर हे चूकीचे आहे हे आपल्याला इस्त्राइलकडे पाहून लक्षात घेतले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

इस्त्राइलने कमी जमीन, पाण्याचा अभाव वाळवंट यासारख्या नैसर्गिक त्रुटी असूनसुध्दा आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रयोग यांच्याआधारावर कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. भारतातील गुजराथ प्रांतांमध्ये कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. गुजराथमध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे इस्त्राइलप्रमाणे आपणही या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊ शकतो. या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून आपण कमी क्षेत्रात जास्ती उत्पन्न आणि चांगल्या दर्जाची शेती करू शकू असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबल हे केंद्र गुजराथच्या एका कोपऱ्यात वसले आहे मात्र आता हळूहळू या केंद्राकडे सर्व शेतकरी आकर्षित होत आहेत. या केंद्रातून माहिती आणि प्रशिक्षण घेऊन कमी क्षेत्रफळ असलेल्या शेतात लाखो रूपयांचे उत्पन्न घेणारे शेतकरी आपण पाहतो आहोत. याचाच अर्थ गुजराथचे प्रयोगशील शेतकरी हा बदल आपलासा करतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
 
 
२०२२ ला भारत देश स्वातंत्र्यांची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. त्यावेळे पर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न व्दिगुणित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण प्रयोग केले पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल.
 
 
याचबरोबर, पाण्याची बचत करून, परिश्रम कमी करून, कमी जागेत जास्त उत्पन्न तसेच निर्यात करण्यायोग्य उत्पन्न कसा तयार करता येईल याकडे सध्या आपण लक्ष देणे गरजेचे आहे. याचबरोबर सेंद्रिय शेती या पर्यायाकडे आपण अधिक लक्ष दिला पाहिजे.
 
 
या वरवडमधील केंद्रांच्या माध्यमातून इस्त्राइल आणि भारत जोडले गेले आहेत. त्यांनी शेतीमध्ये केलेले काम आणि तंत्रज्ञान यांचा आपण योग्य वापर केल्यास भारत खूप मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात प्रगती करेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
  
कुकमा येथील उत्कृष्टता केंद्राचे डीजिटल उद्घाटन
 
कच्छमधील कुकमा गावात असेलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर पोस्ट हार्वेस्ट डेट पाम या केंद्रांचे उद्घाटन इस्त्रइचे पंतप्रधान बेन्जामीन नेत्यन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@