'मोदींना विरोध करणे ही काही लोकांची प्रवृत्तीच'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

मुख्तार अब्बास नक्वी यांचा ओवैसींना टोला




नवी दिल्ली :
'हज यात्रेवरील अनुदान रद्द करण्याच्या निर्णयाचा मुस्लीम समाजाकडून देखील स्वागत करण्यात येत आहे. परंतु फक्त मोदींना विरोध करण्याची मूळ प्रवृत्तीच असल्यामुळे काही लोकांच्या पोटामध्ये या निर्णयामुळे पोटशूळ उठत आहे' अशी तिरकस टीका केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयावर दिलेल्या प्रतिक्रियेवर नक्वी हे बोलत होते.

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशात हज यात्रेला देण्यात येणारे अनुदान रोखण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात येत आहे. मुस्लीम समाजातून देखील सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. त्यात काही राजकीत नेते देखील आहेत. जे या निर्णयाला योग्य म्हणतात परंतु हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. हेच त्यांच्या पोटशुळाचे मूळ करणा बनत आहे. मोदींना विरोध करणे ही त्यांची मूळ प्रवृत्तीच आहे. त्यामुळे निर्णय योग्य असताना देखील ते याला आपला विरोध करत आहेत' अशी प्रतिक्रिया नक्वी यांनी दिली आहे.

केंद्र सरकारकडून हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान करण्याचा ऐतिहासिक निर्णय काल केंद्र सरकारने घेतला. हज यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या पैशाचा वापर अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी करण्यात येईल, असे नक्वी यांनी काल सांगितले होते. सरकारच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले होते. परंतु ओवैसी यांनी यावर खोचक टीका करत, सर्वोच्च न्यायालयाने २००६ मध्ये याविषयी सरकारला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मोदी सरकारने याचे श्रेय लाटू नये, तसेच देशभरात हिंदू यात्रेकरूंना देण्यात येणारे अनुदान देखील बंद करा, अअसे म्हटले होते. ओवैसी यांच्या या वक्तव्याचा नक्वी यांनी आज समाचार घेतला.
@@AUTHORINFO_V1@@