चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव रांची येथे दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

 
रांची :  चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले राजद प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आज रांची येथे न्यायालयासमोर हजर झाले आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयात चारा घोटाळा प्रकरणी ही सुनावणी आहे.
 
लालू प्रसाद यादव यांना आणि त्यांच्या १६ अन्य साथीदारांना न्यायालयाने साढेतीन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, त्यानुसार ते आता तुरुंगवास भोगतायेत मात्र त्यांची सुनावणी व्हिडियो कॉन्फरेंसिंगच्या माध्यमातून झाली होती, त्यामुळे आज न्यायालयाने त्यांना रांची येथे उपस्थित राहण्यास सांगितले होते.
 

काय आहे प्रकरण ?

चारा घोटाळा हा बिहारच्या राजकारणातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जातो. १९९६ मध्ये पशू खाद्यासाठी सरकारी खजिन्यातून ९५० कोटी रुपये घेण्यात आले होते, परंतु त्यावेळचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते जगन्नाथ मिश्रा यांनी हे सर्व पैसे खाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. यानंतर भाजपने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती, यामध्ये लालू यांच्या हात असल्याचे दिसू लागल्यानंतर लालू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर न्यायालयाने त्यांना यात दोषी ठरवत या निवडणूक बंदी देखील घातली होती.

@@AUTHORINFO_V1@@