भारत-इस्राइल एकाच माळेचे मनी : पाक परराष्ट्र मंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |



इस्लामाबाद : भारत आणि इस्राइल यांच्यातील वाढत्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे पाकिस्तानच्या पोटामध्ये पुन्हा पोटशूळ उठू लागला आहे. 'भारत आणि इस्राइल हे दोघे एकाच माळे मनी असून मुस्लीम देशांच्या भूमीवर त्याची नेहमीच वाकडी नजर असते' अशी टीका पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी केली आहे. तसेच दोन्ही देश इस्लामचे कट्टर विरोधी असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे. 
 
 
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे सध्या सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत. पाकिस्तानचे भारताबरोबरच इस्राइलबरोबर देखील हाडवैर आहे. त्यामुळे भारत आणि इस्राइलवर बोचरी टीका करण्याचा प्रयत्न ख्वाजा यांनी केला आहे. 'हे दोन्ही देश एकाच विचारधारेवर चालतात, दोघेही स्वतःच्या स्वार्थासाठी दहशतवादाला खातपाणी घालतात. तसेच मुस्लीम देशांच्या भूमीवर वाकडी नजर ठेवता. भारताला काश्मीर गिळंकृत करायचे आहे, तर इस्राइलला पॅलेसस्टाईनची भूमी आपल्या ताब्यात घ्यायची आहे. त्यामुळे यांची मैत्री वाढणे यात कसलेही नवल नाही' असे ख्वाजा यांनी म्हटले आहे.
यानंतर अमेरिकेवर देखील टीका करत अमेरिकेला पाकिस्तानच्या त्यागाची जाणीव नाही, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. पाकिस्तानने दहशतवादाच्या निर्मुलनासाठी अनेक लढाई लढल्या आहेत, अनेक प्राणांच्या आहुत्या देखील दिल्या आहेत. परंतु त्याचे अमेरिकेला कसलेही देणेघेणे नसून ते फक्त आपल्या स्वार्थासाठी पाकिस्तानचा वापर करत आले आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@