दहशतवाद्यांच्या हस्ते आण्विक शस्त्रे लागल्यास मानवजातीला धोका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |


 
नवी दिल्ली : रासायनिक आणि आण्विक शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती सापडल्यास मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केली आहे. 'रायसिना २०१८' या चर्चासत्रात आज ते बोलत होते.
 
इंटरनेट आणि समाज माध्यमांवर नियंत्रण आवश्यक :
 
इंटरनेट आणि समाज माध्यमांवर थोड्या प्रमाणात नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. दहशतवादी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांचा वापर करतात. भारत एक लोकशाही असलेले राष्ट्र आहे, त्यामुळे समाज माध्यमांवर बंधने आणण्यास कदाचित विरोध होवू शकतो, मात्र भविष्यात नागरिकांची सुरक्षा बघता, याविषयी विचार करणे अत्यावश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
दहशतवाद्यांना नेमक्या कोणत्या देशाचे पाठबळ आहे याचा शोध घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यातून त्यांनी पाकिस्तानला टोला लगावला.
 
दहशतवादी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात, तसेच त्यामुळे त्यांना घुसखोरी करणे सोपे जाते. म्हणूनच तंत्रज्ञानाचा वापर आपणही करत दहशतवाद्यांच्या कारवाया उध्वस्त केल्या पाहीजेत, असेही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@