देशात पहिल्यांना महिला जेल मधील लहान मुलांचे होणार लसीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

 
भोपाळ :  मध्यप्रदेशातील भोपाळ येथे विदीशा येथील कारागृहात बंदी असलेल्या महिलांच्या लहान मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कारागृहात लहान मुलांचे लसीकरण देशात पहिल्यांदाच होत आहे. यामुळे कैदी महिलांच्या लहान मुलांच्या आरोग्याविषयी सरकार काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. 
 
मिशन इंद्रधनुषच्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढील तीन दिवस विदीशा कारागृहात लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निर्देशांवरुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
 
 
 
तसेच मुख्यमंत्री चौहान यांनी सॅम्पल बुलेटिन २०१६ च्या अहवालानुसार मध्यप्रदेशात बालमृत्युदरात ७ अंकाची घट झाली असल्याते सांगितले आहे. संपूर्ण भारतात मध्यप्रदेश बालमृत्युदरात सर्वाधिक घट होणाऱ्या राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे अंक आता ६२ वरुन ५५ वर आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@