नेतन्याहूंनी घेतला पतंगोत्सवाचा आनंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |



 
अहमदाबाद :  इस्राइलचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर असताना आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गुजरात येथे दाखल झाले आहेत. यावेळी गुजरात येथे उत्तरायणचा सण सुरु असून यामध्ये बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील भाग घेतला असून त्यांनी आज पतंग उडविण्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांच्या पत्नी सारा नेतन्याहू देखील उपस्थित होत्या. त्यांनी देखील पतंग उडविण्याची मजा घेतली.
 
आज नेतन्याहू दंपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी मकर संक्रांती निमित्त पतंग उडवली. गुजरात येथे आज नेतन्याहू आणि पंतप्रधान मोदी यांचा भव्य रोडशो आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी नेतन्याहू दंपती सकाळी अहमदाबाद येथे दाखल झाले. त्यानंतर रोडशो ला सुरुवात झाली.
 
 
 
 
 
दरम्यान आज नेतन्याहू दांपत्याने आगरा येथील ताजमहल येथे देखील भेट दिली तसेच समाज माध्यमांवर त्यांचे फोटो प्रसिद्ध होत आहेत. शांतता, प्रेम आणि असीम सौंदर्याचे एक ठिकाण अशा शब्दांमध्ये नेतन्याहू यांनी ताजमहलचे वर्णन केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@