रत्नागिरी जिल्हा भाजपचा बालेकिल्ला बनवू : बाळ माने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

चिपळूणमध्ये अभिष्टचिंतनासाठी अलोट गर्दी

 
 
 
 
चिपळूण : ''३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत विचारांशी बांधिलकी ठेवली, निष्ठेचे राजकारण केले. आई-वडील आज हयात नाहीत, पण त्यांचे संस्कार व आठवणींशिवाय एक क्षणही गेला नाही. जिंकलो तरी मातलो नाही, पराभवात खचणार नाही. कारण जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत मी अखंड बांधील असल्याने जोपर्यंत जनतेची साथ मला आहे, कार्यकर्त्यांचे प्रेम आहे तोपर्यंत तमा बाळगणार नाही,'' असा ठाम विश्‍वास भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी चिपळूण येथे समस्त जिल्ह्यातील जमलेल्या कार्यकर्ते व हितचिंतकांच्या उपस्थितीत व्यक्त केला.
 
 
माने यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कारकीर्दीला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच त्यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून अभिष्टचिंतन सोहळा चिपळूण येथील यू. ई. स्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने चित्रपट व कलाक्षेत्रातील सिने तारे-तारका यांचा सांस्कृतिक नजराण्याचा कार्यक्रमही पार पडला. सुमारे २० हजार कार्यकर्ते, श्रोते या प्रसंगी उपस्थित होते.
 
उपस्थित जनसागराला जिल्हाध्यक्ष माने यांनी अभिवादन केले व यापुढेही जिल्ह्याचे विकासाचे प्रश्‍न मार्गी लावून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली. प्रारंभी दीप प्रज्वलन करून अभिष्टचिंतन सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी रवींद्र चव्हाण, उद्योजिका व भाजप नेत्या राजश्री विश्‍वासराव, आ. भास्कर जाधव, माजी आ. बापू खेडेकर, शेखर निकम, वामनराव पवार, सतीश मोरे, माधवी माने, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, वैशाली निमकर, प्रमोद अधटराव आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
 
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. जाधवांकडून कौतुक : 
 
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मानेंच्या नेतृत्वाचे पैलू उलगडले. पक्षात त्यांनी केलेले काम धडाकेबाज राहिले आहे. कोकणातील ते पक्षाचा चेहरा आहेत. ३० वर्षांची त्यांची राजकीय कारकीर्द भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी अशी आहे, असे सांगितले. तर आ. भास्कर जाधव यांनी, माने आपले साडू असले तरी आमचे राजकीय विचार वेगळे आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षावर ठेवलेली निष्ठा व खडतरपणे राजकारणात मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. जिल्ह्याच्या विकासाची समज त्यांना आहे. पक्षासाठी ते ज्या मेहनतीने काम करीत आहेत, धडपडत आहेत, ते माझे राजकीय विरोधक असले तरी मला त्यांच्यातील नेतृत्व नेहमीच भावल्याचे जाहीरपणे सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@