४ वर्षे बारमेर रिफायनरीचे काम भाजपनेच रोखले - काँग्रेसचा आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

 
राजस्थान येथे ऐतिहासिक बारमेर रिफायनरीचे काम गेल्या ४ वर्षांपासून भाजपने रोखले असल्याचा आरोप काँग्रेस तर्फे केला गेला आहे. काँग्रेसने केलेल्या एका ट्वीटद्वारे म्हटले आहे की, बारमेर रिफायनरी म्हणजे तोट्याचा व्यवहार म्हणून भाजप सरकारने त्याचे काम रोखले होते.
 
 
४ वर्षे हे काम रोखल्यामुळे तरुणांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे देशाचे ५ कोटी ८०९ लाखाचे नुकसान करून त्या कामाचा 'शुभारंभ' केल्याचे मिरवत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या ट्वीटर वरून करण्यात आला आहे.
 
 
१६ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते बारमेर रिफायनरीचे उद्घाटन करण्यात आले. दुष्काळ आणि काँग्रेस समानार्थी शब्द आहेत, असा टोला पंतप्रधानांनी लगावला होता. भाजप सरकारच्या काळात बारमेर रिफायनरी सुरु होऊन राजस्थानातील लाखो युवकांना रोजगार प्राप्त झाला, असा त्यांच्या भाषणाचा आशय होता. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील भाजपवर प्रत्यारोप केला आहे.
 
 
बारमेर रिफायनरी योजनेचा खर्च ३७ कोटी ३२० लाख वरून ४३ कोटी १२९ लाख एवढा का केला गेला? आणि जी योजना २०१८ साली सुरु होणे अपेक्षित होते, ती २०२२ पर्यंत का पुढे ढकलली गेली? असे प्रश्न विचारले गेले आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@