स्टेप अप फाऊंडेशनतर्फे साधला जाणार किशोरवयीन मुलांशी संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

"समयोचित सम्यक संवादः" कार्यक्रमाचे आयोजन
शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि महापौर मुक्ता टिळक यांची उपस्थिती

 
 
 
 
पुणे : स्टेप अप फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "समयोचित सम्यक संवादः" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये किशोरवयीन मुलांशी त्यांच्या विविध प्रश्नांवर संवाद साधला जाणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्टेप अप फाऊंडेशनच्या संस्थापिका गौरी वैद यांनी दिली.
 
हा कार्यक्रम १९ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे दुपारी १ वाजता होणार आहे. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक हे प्रमुख पाहुणे आणि पुणे महानगरपालिका सभागृह नेते श्रीनाथजी भिमाले, मुख्य शिक्षण अधिकारी दीपक माळी, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, माजी उपमहापौर आबा बागुल आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच विनोद तावडे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
 
स्टेप अप फाऊंडेशन मागील ७ वर्षांपासून विविध शाळांमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी "जीवनमूल्य शिक्षण" हा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामधून किशोरवयीन मुलांमधील होणारे बदल, लैंगिकता, व्यसन, लैंगिक अत्याचार तसेच अभ्यास पद्धती आणि करिअर मार्गदर्शन हे विषय हाताळले जातात. या विषयांवर समुपदेशनाची सत्रे घेतली जातात.
 
 
 
 
 
याच धर्तीवर "समयोचित सम्यक संवादः" म्हणजेच योग्य वेळी योग्य संवाद हा कार्यक्रम घेतला जात आहे, महानगरपालिकेतील ज्या शाळांमध्ये "जीवनमूल्य शिक्षण" हा प्रकल्प घेतला गेला त्यातील काही विद्यार्थी त्यांचे अभिप्राय या कार्यक्रमात मांडतील तसेच त्यांचे अनुभव सांगतील. तसेच संस्थेच्या कामातून प्रेरणा घेऊन ज्यांनी स्वतः वेगवेगळे उपक्रम राबवले त्यांचे कौतुकही यावेळी केले जाणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@