नव्या नियोजन समितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |


यवतमाळ : जिल्ह्यामध्ये नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या सदस्यांची पालकमंत्री मदन येरावार यांनी काल पहिली आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्ह्यात सुरु असलेली विकास कामे आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्यांची माहिती समितीच्या नव्या अधिकाऱ्यांना दिली.

नियोजन समिती ही जिल्ह्याचा मुख्य गाभा आहे, त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये सुसंगत आणि कामाची तत्परता असे अत्यंत गरजेची आहे, असे येरावार यांनी यावेळी म्हटले. नव्या समितीने जिल्ह्याच्या ४७३ कोटी रुपयांच्या विकासाचे नियोजन करणे महत्वाचे आहे. नियोजन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत २४ कोटी रुपये जनसुविधेअंतर्गत स्मशानभुमीच्या विकासासाठी देण्यात आले आहे. तसेच २३२ ग्रामपंचायत भवन उभारण्याचे नियोजन आहे. १४ व्या वित्त आयोगात प्रथम प्राधान्य पाणी पुरवठा योजनेला तर दुसरे प्राधान्य स्वच्छतेला देण्यात आले आहे.

याच बरोबर जिल्हात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात कायम स्वरूपी पाणी पुरवठा सुविधा उभारण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या अमृत जल योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना इ. माहिती देत या योजनांतर्गत रखडलेल्या अनेक योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कामांच्या पूर्ततेसाठी समितीने नव्या कल्पना अमलात आणाव्यात, असे देखील ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@