मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारताला पार करावे लागणार २८६ धावांचे लक्ष्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |

 

 
सेंच्युरियन (दक्षिण आफ्रिका) : सेंच्युरियन येथे सुरु असणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारता समोर २८६ धावांचे खडतर लक्ष ठेवले आहे. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकल्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताला या मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. कालच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे दोन गडी बाद झाले होते. आज सकाळपासूनच एबी डिव्हिलियर्स (८०) व डी. एल्गर (६१) या जोडीने शतकी भागीदारी करत संघाला दोनशेचा टप्पा पार करून देण्यात मोलाची मदत केली. त्यांनतर कर्णधार प्लेसिस याच्या ४८ धावांच्या खेळीमुळेही दक्षिण आफ्रिकेला भारतासमोर मोठे आव्हान उभारता आले.
 
 
एबी व एल्गर यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत खेळ करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याचे काम केले खरे पण एबीसह भारताच्या मोहंमद शामीने चार फलंदाज बाद केल्याने तळातल्या फलंदाजांनी नंतर बचावात्मक पवित्रा स्वीकारला. एबी व एल्गर मैदानात असताना ३०० हुन अधिक धावांचे लक्ष भारतासमोर ठेवले जाईल अशी परिस्थिती होती पण शामीने या सर्व अशांवर पाणी फेरले. शामीने चार, बुमराहने तीन, शर्माने २ व अश्विनने एक गडी बाद केला.
 

 

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झाली असून मुरली विजय व लोकेश राहुल सावध खेळ करत आहेत. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा ३ षटकात भारताने बिन बाद पाच धावा केल्या होत्या.
 

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@