प्रवीण तोगडिया यांच्या प्रकृतीत सुधारणा..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |

 
अहमदाबाद :  काल विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया अहमदाबाद येथे बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ माजली होती, मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते शुद्धीवर आले असल्याची माहिती समोर येत आहे. काल सकाळपासून ते बेपत्ता असल्या कारणाने विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण होते.
 
 
 
एका जुन्या प्रकरणात त्यांना अटक करण्यासाठी राजस्थान पोलिस अहमदाबाद येथे दाखल झाली होते, मात्र प्रवीण तोगडिया उपस्थित नसल्याने ते माघारी परतले. विहिपच्या कार्यकर्त्यांनी राजस्थान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याची शक्यता वर्तविली होती, मात्र अखेर रात्री ते एका बागेत बेशुद्ध अवस्थेत आढळले. शरीरात साखरेचे प्रमाण कमी झाले असल्याने त्यांची शुद्ध हरपली असे सांगण्यात येत आहे.
 
प्रवीण तोगडिया यांना गुजरात पोलीस किंवा राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याचे गुजरात गुन्हे शाखेने स्पष्ट केले होते. मात्र त्यांच्या बेपत्ता होण्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होती. अखेर त्यांच्यावर अहमदाबाद येथील चंद्रमणी रुग्णालयात  त्वरित उपचार सुरु करण्यात आले. आणि आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@