राहुल गांधींच्या 'त्या पोस्टरबाज' समर्थका विरोधात गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |


अमेठी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधी अमेठीमध्ये लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टरवरून अमेठीतील भाजप नेत्यानी कॉंग्रेस आणि पोस्टर लावणाऱ्या राहुल समर्थकवर गुन्हा दाखल केला आहे. कॉंग्रेसने या पोस्टरच्या माध्यमातून पंतप्रधान पदाचा आणि भारतीय जनता पक्षाचा अपमान केल्याचा आरोप या अमेठीचे भाजप नेते सूर्यप्रकाश तिवारी यांनी केला असून पोलिसांनी देखील या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
 
 
अमेठीमधील राहुल समर्थक रामा शंकर शर्मा यांनी अमेठीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधी एक पोस्टर चिकटवले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रावणाच्या वेशात दाखवण्यात आले होते व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राम बनून पंतप्रधान मोदींवर शरसंधान करत असल्याचे आक्षेपार्ह दृश्य यात दाखवण्यात आले होते. तसेच "राहुल के रूप में भगवान राम का अवतार २०१९ में आयेगा राहुल राज (राम राज)" असे देखील पोस्टरवर लिहिण्यात आले होते. यानंतर सोशल मिडीयावर या पोस्टरसंबंधी मोठी चर्चा रंगली होती.
 
 
यानंतर अमेठीमधील भाजप कार्यकर्ते सूर्यप्रकाश तिवारी यांनी या पोस्टरवर आक्षेप घेत शर्मा आणि कॉंग्रेस पक्षासंबधी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी देखील या राहुल समर्थकाविरोधात गुन्हा दाखल करत हे सर्व पोस्टर हटवण्याचे आदेश दिले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@