रंगांची उधळण करणार्‍या वरोड्याच्या रंगकर्मीची झेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |


( जयवंत काकडे यांच्या याच व्यंगचित्राचा समावेश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. )
वरोडा (चंद्रपूर) : माणसाच्या आयुष्यात एक क्षण असा यावा की, एक खिडकी अचानक उघडावी आणि सारा भविष्यकाळ आत यावा. पुढे तो इतका उजळावा की अवघे जगणेच जणू एखाद्या छंदाने कुरवळावे आणि सुकून मिळावा. वरोड्यातील जयवंत काकडे या मनस्वी कलावंताच्या जगण्याना नवे कोंदण पडले आणि आयुष्यातील कला साधना सिद्धीस गेली.
वयाची ८० वर्षे रंगांची उधळण करणारा आणि विविध राजकीय सामाजिक विषयावर आपल्या व्यंगचित्रातून भाष्य करणारा हा रंगकर्मी तपस्वी आहे. मागील १५ वर्षांपासून ‘मार्मिक’मधील ‘काकड्यांची कोशिंबिर’ रसिकांच्या मनाचा ठाव घेत असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा स्नेह अधोरेखित होतो आणि त्यांची छाती इंचभर फुगते. बाळासाहेबांशी व्यक्तीश: परिचय असल्यामुळे ते ‘सामना’मध्ये व्यंगचित्र काढत राहिले. पुढे हा प्रवास ‘आवाज’, ‘जत्रा’, ‘वसंत’, ‘मार्मिक’, ‘उद्योजक’, ‘हंस’ आणि ‘किर्लोस्कर’ या मासिकांमधून व दिवाळी अंकांमधून वाट शोधत वाचकांना भूरळ घालत राहिला. व्यवसायाने वकिल असलेले काकडे रंगांच्या छटात हरवले आणि तेही एक हौशी कलावंत म्हणून. पैसा हे जगण्याच साधन आहे. ज्या क्षणी ते साध्य होते तेव्हा कलावंताच्या साधनेला बेड्या पडतात, असे ते सांगतात. जगण्याचा अर्थ चित्रात शोधत राहिलो आणि सामाजिक जाविणेतून समाजातील रंगिबिरंगी मुखवट्यांना आकार देत राहिलो. सामाजिक आशयाची व्यंगचित्रे दीर्घायुषी असतात, असा समज असणार्‍या या रंगकर्मीने आजपर्यंत कलेशी इमानदारी राखली आहे. 


(  जयवंत काकडे  )
नुकताच जर्मन विभाग, मुंबई विद्यापीठ आणि मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात अन्य भाषकांना मराठी शिकविण्यासाठी सुरू असणार्‍या ‘माय मराठी’ या प्रकल्पासाठी अध्यापन सामग्री तयार करण्याचे काम सुरू आहे. या अभ्यासक्रमात जयवंत काकडे यांच्या एका सामाजिक आशयाच्या व्यंगचित्राचा समावेश करण्यात येणार आहे. 
या समावेशामुळे त्यांच्यातील व्यंग चित्रकार सातासमुद्रापलिकडे उडान घेणार असून, हा आनंद आयुष्याच्या सांध्यप्रवासात काजवा चमकावा असा आहे. मुंबई विद्यापीठात जर्मन भाषा विभाग १९९३ पासून सुरू असून, यात या चित्रकाराला संधी मिळाली, हा आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. वेलांटीसारखे पांढरे केस, वेधक नजर, विस्कटलेला पोषाख, पडका पण रेखीव वाडा आणि पुस्तकांच्या गराड्यात गुंतलेला हा कलावंत पाहताक्षणीच कलंदर जाणवतो. रंगखोलीत टांगलेली व्यंगचित्रे, वाङ्मय साहित्य, रंगांचे कुंचले, आठवणिंनी तुडूंब भरलेली लाकडी कपाटे ही या रंगकर्मिच्या साधनेची साक्षिदार आहेत. असा उल्हासित वृद्धापकाळ एखाद्या कलासाधकांच्या वाट्याला येवो. ‘आलस्य हि मनुष्याणां शरीरस्यो महान रिपु :, नास्त्युधमसमो बन्धुर्य कृत्वा नावसीदार्त’
प्रशांत खुळे
@@AUTHORINFO_V1@@