२६/११ मध्ये आई वडीलांना गमावणारा मोशे मुंबई येथे दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |

 
मुंबई : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात आपले आई-वडील गमावलेला मोशे हॉल्ट्सबर्ग नामक मुलगा आज मुंबईत दाखल झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी त्याचे आगमन झाले, आपल्या आजी आजोबांसोबत तो भारतात आला आहे. ९ वर्षांनी मोशे मुंबईत आल्याने त्याच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली आहे.
 
 
 
 
नरीमन हाउस येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याने आपले आई वडील गमावले. आज मुंबई येथे दाखल झाल्यानंतर तो नरीमन हाऊसला देखील भेट देणार आहे.
 
२६/११ च्या हल्ल्यातून मोशे मात्र सुखरुप बचावला होता. त्याचा सांभाळ करणाऱ्या सॅन्ड्रा सॅम्युअल या महिलेने त्याला वाचवले होते.
 
या मुंबई भेटी दरम्यान मोशे ताज हॉटेल, नरीमन हाऊस आणि ट्रायडेंट हॉटेल येथेही भेट देणार आहे. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे ६ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. १९ जानेवारीला मोशे त्यांच्यासोबतच इस्राईलसाठी रवाना होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@