अवयव दान म्हणजे एक राष्ट्रीय चळवळ झाली पाहिजे : उपराष्ट्रपती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |

 
दिल्ली :  आपले शरीर म्हणजे मृत्युनंतरही जगण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे. अवयन दानामुळे आपण एखाद्याला जीवन दान देवू शकतो. त्यामुळे अवयव दान ही एक राष्ट्रीय चळवळ बनली पाहिजे. असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले. ग्लेनीगल्स ग्लोबल या संस्थेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते.
 
 
 
 
 
देशातील सर्व प्रगत तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिल्याबद्दल मी ग्लेनीगल्स ग्लोबल या संस्थेचे आभार मानतो, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच यामुळे अनेक युवा डॉक्टर्स अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत पारंगत होवू शकतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
 
 
सध्याची जीवनशैली आजच्या पिढीसाठी हानीकारक आहे. या जीवशैलीमुळे यकृतासंबंधी अनेक विकार निर्माण होत आहेत त्यामुळे बाहेरचे अधिक खाणे, मद्यपानाचे सेवन हे टाळून अधिक सकस अन्न ग्रहण करणे तसेच दररोज योगा आणि आसने करणे यामुळे नागरिकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडतील, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
@@AUTHORINFO_V1@@