सहकारी बँकांसमोरील आव्हाने पेलण्यासाठीअखिल भारतीय बँक परिषद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |
 
 
 
ळगाव जनता बँक व सहकार भारती तर्फे आयोजन
 
सहकार भारती या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अखिल भारतीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. लक्षमणराव इनामदार यांचे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्यसाधून खान्देशातील अग्रगण्य अशा जळगाव जनता सहकारी बँक व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८ व १९ जानेवारी रोजी जैन हिल्स येथे सहकारी बँकांसाठी राष्ट्रीय पातळीवरील सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी असे सुमारे २५० प्रतिनिधी उपस्थित राहतील. सहकारी बँकांसंबंधी बदलती आव्हाने पेलण्यासाठी व्यावसायिक धोरणे, तंत्रज्ञान विकास व क्षमता विकास या महत्वाच्या विषयांवर तांत्रिक चर्चासत्र या परिषदेत आयोजित केली जाणार आहेत. तज्ञ मार्गदर्शक सादरिकरण, गट चर्चा, प्रश्नउत्तरे अशा स्वरुपात विचार विनिमय होणार आहे.
 
या परिषदेचे उद्घाटन सहाकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिन्द्रभाई मेहता यांच्या हस्ते संपन्न होत असून प्रमुख अतिथी म्हणून जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष श्री अनिल जैन यांची उपस्थिती लाभणार आहेत. या परिषदेत सहकारी बँकांसमोरील क्लीष्ट आव्हाने पेलण्यासाठी व्यावसायिक धोरणे, क्षमता विकास, तंत्रज्ञान क्षमता या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा या परिषदेत होणार आहे. त्यातूनच नागरी सहकारी बँकांच्या चळवळीस नवीन दिशादर्शन होईल. परिषदेच्या समारोपासाठी सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
सदर परिषदेत सहकार क्षेत्रातील विविध हालचालींमध्ये बदल करणेबाबत सदर परिषदेचा उद्देश राहील. माहिती तंत्रज्ञानातील विविध बदल,व्यवसाय धोरण,क्षमता वाढविणे तसेच वाढत्या जटील वातावरणास सामोरे जाणे अशा विविध विषयांवर सदर परिषदेत चर्चा करण्यात येईल. बँकिंग व तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर चर्चा तसेच विविध क्षेत्रातील सादरीकरण यांचा सदर परिषदेत सहभाग असणार आहे.
 
मागील २५ वर्षात भारत देशात अर्थशास्र,बँकिग व आर्थिक विभागात प्रचंड परिवर्तन झाले आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीने तर या परिवर्तनास अनेक आव्हाने दिली आहेत. आजच्या युगात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध साधने बँकिंग क्षेत्रात वापरणे आवश्यक झाले आहे,त्यात मानव संसाधन व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा विचार करण्याचा विषय आज समोर आहे. युवा पिढीतील ग्राहकांच्या बँकेकडून असलेल्या अपेक्षा महत्वपूर्ण आहेत. ठेवीदारांचे वेगवेगळ्या साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे.जसे म्युचुअल फंडस्, बॉन्डस् या सारख्या पर्यायांमध्ये ग्राहक गुंतवणूक करू लागले आहेत. वरील सर्व बाबींचा व वाढत्या आव्हानांचा विचार करता सर्व नागरी सहकारी बँकांनी एकत्रित येऊन या सर्व विषयांवर विवेचन करण्याची वेळ आली आहे.
 
परिषदेत दि.१८ जानेवारी रोजी विविध विषयांवर सहकार भारतीचे संरक्षक मा.श्री सतीश मराठे, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री उदय कर्वे, बँक ऑफ बडोदाचे प्रमुख अधिकारी, श्री एस.व्ही.हर्डीकर थॉट अॅनलिटिक ऑफ अमेरिका या कंपनीचे श्री निलेश पाटील व सौरव कुमार, फिनाकस सोलूश्यंस प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भुषण कोंडूरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विविध तंत्रज्ञान विषयांवर सादरीकरण देखील सादर होणार आहेत. दि.१९ जानेवारी रोजी कपॅसिटी बिल्डींग विषयावर सी.ए.श्री प्रकाश पाठक, सी.ए.श्री विनायक गोविलकर, श्री अरविंद खळदकर, श्री सतीश मोध यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
 
तसेच विविध विषयांवर चर्चा सत्र होणार असून यात टॅक्स मॅनेजमेंट यात जळगाव जनता बँकेचे संचालक तथा ज्येष्ठ चार्टर्ड अकौंटंट श्री जयेशभाई दोशी, श्री छत्रपती राजश्री शाहू सहकारी बँक, बीड चे अध्यक्ष श्री सत्यनारायण लोहिया, मुंबई येथील श्री. दिपक मुकादम यांचा समावेश असणार आहे. ट्रेझरी मॅनेजमेंट विषयावर जनसेवा सहकारी बँक,पुणे चे उपाध्यक्ष डॉ.श्री राजेंद्र हिरेमठ, भारतीय स्टेट बँकेच्या डी.एफ.एच.आय. विभागाचे एम.डी. यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सदर नागरी सहकारी बँकांच्या परिषदेतील सहकारी बँकांच्या सहभागाचे सहकार भारती व जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने स्वागत आहे असे सहकारी भारती चे सर्व पदाधिकारी व जळगाव जनता सहकारी बँक परिवाराच्या वतीने कळविण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@