अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |

अमर पाटील यांनी केली होती मागणी

 
 
 
 
पनवेल : प्रशमीत संरचनेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी जाहीर केलेल्या मुदतीला दोन महिन्यांची वाढ मिळाली आहे. या संदर्भात पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मुदतवाढीची मागणी केली होती.
 
अमर पाटील यांनी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, ''पनवेल महानगरपालिकेची स्थापना नव्याने झालेली असून त्यात ग्रामीण व शहरी भागाचा समावेश झाला आहे. महानगरपालिका हद्दीतील बांधकामे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमन १९६६ मधील कलम ५२ नुसार अनधिकृत बांधकामे प्रशमन आकार लावून प्रशमीत संरचना म्हणून घोषित करण्याकरिता नागरिकांकडून दि. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांची कागदपत्रे सादर करण्यासाठी महापालिकेकडून दि.१५ नोव्हेंबर २०१७ पासून दोन महिन्यांची मुदत जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात आली होती, परंतु ग्रामीण भागातील नागरिकांना सदर नोटिशीबाबत माहिती पोहोचू न शकल्याने काही नागरिकांकडून विहित वेळेत कागदपत्रे महापालिकेकडे सादर करता आली नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी दि. १५ मार्चपर्यंत मुदतवाढ केली आहे, अशी माहिती अमर पाटील यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@