शिशुविहार व बालक मंदिरात मकरसंक्रातीचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचालित, शिशुविहार व बालक मंदिर, इंग्रजी विभागामध्ये दि.१४ जानेवारी रोजी मकरसंक्रातीचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
 
या प्रसंगी शालेय परिपाठावेळी, पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा विरोधात जनजागृती करण्यासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पतंग बनविणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 
यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक पतंग तयार करून समाजजागृती करणारी घोषवाक्येदेखील लिहिली. यावेळी उत्कृष्ट पतंगांना बक्षीसे देण्यात आली. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका साक्षी भालेराव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@