लासलगाव, निफाड, नांदगावात रेल्वेला थांबा हवा : खा.चव्हाण यांचे निवेदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |
 

 
 

नाशिक : लासलगाव येथे नंदीग्राम( ११०४०१) डाऊन रेल्वे एक्सप्रेससाठी व निफाड, नांदगाव व न्यायडोंगरी येथे रेल्वेगाड्यांच्या थांब्यासाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना निवेदन दिले.
 
लासलगाव येथे नंदीग्राम( ११०४०१) डाऊन रेल्वे एक्सप्रेससाठी, निफाड येथे कामयानी एक्सप्रेस (११०७१/११०७२) भुसावळ-पुणे (११०२५ /११०२६) एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस (११४०१, ११४०२ ) व नांदगाव येथे महानगरी (११०९३ /११०९४) भुसावळ-पुणे (११०२५ /११०२६) तसेच न्यायडोंगरी येथे भुसावळ-पुणे (११०२५ /११०२६) एक्सप्रेस व सेवाग्राम एक्सप्रेस (१२१३९ /१२१४०) या रेल्वेगाड्यांच्या थांब्यासाठी निवेदन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना रेल्वे मंत्रालयात नवी दिल्ली येथे दिले.
 
लासलगाव, नांदगाव, निफाड न्यायडोंगरी येथील रेल्वेगाड्यांचा थांबा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा कसा आहे, हे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना सांगितले. लासलगाव, नांदगाव, निफाड व न्यायडोंगरीकडून नाशिक व मुंबईकडे जाण्यासाठी -येण्यासाठी या गाड्यांची वेळ रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय योग्य आहे. यावर केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांना योग्य परीक्षण करून नक्कीच थांबा देण्याचे आश्वासन दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@