बेंजामिन नेतन्याहू यांची ताजमहालला भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
आग्रा: इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज जगातील सातवे आश्चर्य असलेल्या ताजमहाल स्मारकाला भेट दिली. बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या पत्नीसोबत ताजमहालचा फेरफटका मारला आहे. येथे त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत छायाचित्र देखील काढून घेतले आहे.
 

 
यावेळी बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी यांनी मिळून ताजमहालचा संपूर्ण फेरफटका मारला. तसेच त्यांनी यावेळी ताजमहालच्या नक्षीकामाचे बारकाईने निरीक्षण केले. बेंजामिन नेतन्याहू यांचा हा दौरा ऐतिहासिक दौरा मानला जात आहे. २००३ नंतर भारत भेटीला आलेले बेंजामिन नेतन्याहू हे पहिलेच इस्राईलचे पंतप्रधान आहेत.
 
भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांचे संबंध घट्ट होण्याच्या दृष्टीने हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. भारत भेटीसाठी सहा दिवस भारतात येणारे बेंजामिन नेतन्याहू हे इस्राईलचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. तसेच काही काळापासून भारत आणि इस्राईलचे संबंध अतिशय चांगले असल्याने हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्वाचा ठरणार आहे. 
@@AUTHORINFO_V1@@