काँग्रेस आणि दुष्काळ हे जुळे भाऊ आहेत: नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
राजस्थान: काँग्रेस पक्ष आणि देशातील दुष्काळ हे दोन्ही जुळे भाऊ आहेत असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. आज राजस्थानमधील बाडमेर येथे ‘एचपीसीएल’ रिफायनरी कामाच्या उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मोदी उपस्थित होते यावेळी जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते. आजपर्यंत जिथे जिथे काँग्रेस पक्ष निवडून आला तिथे तिथे आजपर्यंत दुष्काळच पाहायला मिळाला. मात्र राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात त्यांनी राजस्थानला पाणी दिले अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.
 
 
 
भारतीय संसद हे लोकव्यवहाराचे मंदिर असून या मंदिरात खोटे बोलणे हे चुकीचे आहे. मात्र जेव्हा मी मागील वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पाचा अभ्यास केला तेव्हा मला असे लक्षात आले की, काँग्रेसने मागील वर्षी ज्या १,५०० योजना घोषित केल्या त्या केवळ कागदावरच आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
 
भारताजवळ आता वेळ आहे त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करून ‘संकल्प से सिद्धी’ हा उपक्रम आपण घडवून आणायला हवा तसेच यातून २०२२ पर्यंत आपल्या स्वप्नातील भारत घडवायला हवा असेही ते यावेळी म्हणाले. ‘गरिबी घालवा’ अशा घोषणा करण्यात आल्या तसेच या माध्यमातून फक्त मत खाण्यात आलीत मात्र देशाचा विकास करण्यात आला नाही केवळ मतांच्या राजकारणातून गरिबांना लुटण्यात आले असा आरोप नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर केला.
 
 
 
 
येत्या तीन वर्षांमध्ये भारतामध्ये नवीन क्रांती घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. भारताचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी नवीन योजना आणण्यात आल्या. गरिबांना सशक्त करणे हा आमचा प्रयत्न असणार आहे. आजपर्यंत ‘प्रधानमंत्री जनधन’ योजनेंतर्गत ३२ कोटी लोकांचे बँक खाते काढण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी जनतेला दिली. 
 
@@AUTHORINFO_V1@@