बारमेर रिफायनरीचे पंतप्रधानाच्या हस्ते आज होणार उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |

 
बारमेर (राजस्थान) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या पहिल्या तेल रिफायनरीचे आज उद्घाटन करणार आहेत. राजस्थानातील बारमेर जिल्ह्यात असलेल्या पंचपदरा येथे नव्या तेल रिफायनरीचे काम पंतप्रधानांच्या हस्ते सुरु होणार आहे.
 
 
 
राजस्थान येथील नागरिक हा प्रकल्प सुरु होण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत, आज त्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. त्यामुळे राजस्थानसाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिन ठरणार आहे. हा प्रकल्प पश्चिम राजस्थानात मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरेल.
 
 
राजस्थान सरकार आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरु करण्यात आला असून यात ४३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा एकहाती गुंतवणूक असलेला प्रकल्प ठरणार आहे.
 
 
यामुळे राजस्थान एका मोठ्या उंचीवर पोहोचून देशातील इंधन तेलाची स्वावलंबनाकाडे वाटचाल होईल, अशी अशा व्यक्त केली जात आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@