माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे - डॉ. प्रवीण तोगडिया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |

 
 
अहमदाबाद : दहा वर्षांपूर्वीचे एक प्रकरण पुन्हा उकरून काढून मला त्यात गोवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला. काल दिवसभर बेपत्ता असलेले तोगडिया रात्री उशिरा एका उद्यानात बेशुद्ध अवस्थेत सापडले, त्यांना तत्काळ अहमदाबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्रभर चाललेल्या उपचारानंतर आज त्यांच्या प्रकृतीत मोठ्याप्रमाणात सुधारणा झाली आहे. त्यामुळेच तोगडिया यांनी घडलेला प्रकार उघडकीस आणण्यासाठी अहमदाबाद येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते. हिंदुत्वासाठी असलेला माझा लढा यामुळे थांबणार नाही, अथवा कमी देखील होणार नाही, असे त्यांनी यावेळी खडसावून सांगितले.
 
 
 
राजस्थान पोलीस मला अटक करून ठार करण्याच्या बेतात असल्याची माहिती मला मिळाली. माझ्या विरोधात मोठा कट रचला जात आहे. मला माहित नसलेल्या जुन्या फाईल उघडून माझा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे असे तोगडिया यांनी आपली बाजू मांडताना सांगितले. मी राजस्थान पोलीस अथवा गुजरात पोलिसांच्या विरोधात नाही. मात्र ज्या प्रकारे माझ्या विरोधात कट रचला जात आहे, त्याविरोधात मी आवाज उठवेन, असे त्यांनी खडसावून सांगितले.
 
 
 
पोलिसांना माझ्या घराची झडती घ्यायची आहे. मात्र मी माझ्या घराबाहेर वकिल तैनात करून आलो आहे. आता पोलिस, वकिल आणि माध्यमे सोबत असतानाच मी त्या घरात प्रवेश करेन तेव्हाच लोकांना माझ्या घरात खरेच काही नाही हे लक्षात येईल असे सांगत असतानाच त्यांना रडू आले. माझ्या घरात केवळ एक कपड्यांची पिशवी आणि एक पुस्तकांची पिशवी एवढेच सामान आहे. मी देशासाठी व हिंदू धर्मासाठी घरादाराचा त्याग केला आहे, त्यामुळे मी मरणाला भीत नाही. पण आपल्याच लोकांकडून हे घडत असल्यामुळे मला पीडा होत आहे असे तोगडिया यावेळी म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@